शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
पिप्री खुर्द : गेल्या चार- पाच दिवसांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे संत्रापिकांसह कपाशी सोयाबीन ज्वारी मका पिकांवर आता धुके पडल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर उत्पादनात फटका बसणार आहे.ढगाळ वातावरण राहत असल्याने कपाशीच्या पाती गळण होत आहे सोयाबीन ची शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हे धुके पिकांवर रोगराई पसरत असल्याने शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र कडेच आपली धाव घ्यावी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून धुके खूप मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकऱ्यांला पुन्हा पिकांवर फवारणी करावी लागत आहे. ४ सप्टेंबर ला दुपारच्या दोन वाजेपर्यंत धुक्याची च्यादर पसरलेली होती.संपूर्ण परिसर हा पांढरा चादरीने गोठलेला दिसत होता. पिप्री खुर्द परिसरातील वातावरण पूर्णपणे शेतातील पिकांवर धुक्यातून नीघालेल्या दंवाचे थेंब कपाशीच्या पिकांवर दिसत आहेत. शेतामध्ये पूर्णपणे गोठलेल्या अवस्थेत पिकांवर दिसत होते.आधीच सुरवातीपासुन पिकांवर रोगराई होती. त्यांतच आता धुके पडत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.आता नव्याने धुके पडल्याने कपाशी व सोयाबीन वर या पिकांवर कोणत्या प्रकारचे रोगराई येणार हि चिंता शेतकऱ्यांना चेह-यावर दिसत आहे. कपाशीवर आधीच गुलाबी बोंडअळी ते संकट कमी होत नाहीत तर कपाशीवर पांढरे तुरतुडे रस सोसक किडे व आता धुके पडल्याने कपाशीची पेरलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
सोयाबीन वर आधी खोंड किळा व उंट अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता ऐन शेंगा भरण्याच्या वेळी ढगाळ वातावरणात धुके पडल्याने सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.खरीप हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळत नसल्यामुळे उत्पादात कमालीची घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. उमरा मक्रमपुर शिवपुर शहापूर पिंप्री खुर्द बेलुरा जितापूर बोडी लाडेगाव पिंप्री जैन खेरखेड एदलापुर चितलवाडी या गावात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामात कपाशी सोयाबीन तूर ज्वारी मका पिकांची लागवड केली.मात्र त्यात आता घट होण्याची शक्यता आहे.
“या वर्षी पाऊस वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांला दुबार पेरणी करावी लागली होती.त्यांतून शेतकरी सावरला नाहींच तर सप्टेंबर महिन्यातच कपाशी व सोयाबीन संत्रा नींबू या पिकांवर धुके पडतं असल्याने मोठ्या प्रमाणात मृग बहार ची फळ गळती होत आहे तसेच खरीप पिकांना यांचा चांगलाच फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.”
सुरेश मगर, शेतकरी पिंप्री खुर्द