अभिजीत फंडाट तालुका
प्रतिनिधी अकोला
वटपौर्णिमेचे औचित्य साधून कंचनपूर येथे ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना वृक्ष वाटप करण्यात आले.वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात. पूजनासाठी आलेल्या महिलांना ग्रामपंचायत कडून झाडाचे वाटप करण्यात आले. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता,पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच आता वर्षभर विविध सण-समारंभ वा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण केले जात आहेत.आजदेखील वाटपौर्णिमेचे औचित्त्य साधत कंचनपुर येथे ग्रामपंचायत च्या वतीने महिलांना वृक्ष वाटप करण्यात आले.यावेळी गावातील महिलांसह बचतगटातील महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षीताई शेळके, ज्योतीताई ताई डिक्कर, दीपमाला शिरसाट,लिलाबाई बाई शिरसाठ,या आदींची यावेळी उपस्तीती होती…तसेच गावातील एकूण 14 गटांच्या महिला अध्यक्ष,सचिव,उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन गावातील बचत गटाच्या सीआरपी ज्योती डिक्कर यांनी केले.. तर आभार प्रदर्शन मुक्ताई गटाचे अध्यक्ष शालिनीताई चोरे यांनी केले…










