अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला: दि.२४ जून – २०२१ कला, साहित्य आणि सांस्कृतीक क्षेत्रात आपल्या अकोल्याचे स्थान नेहमीचं पुढे राहीलेले आहे. आपल्या अकोल्याचा देशमुख फाईल रेल्वे कॅार्टर येथे राहणारा आणि श्री.शिवाजी महाविद्यालयाचा डॅा.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचा विद्यार्थी असलेला विक्की मोटे १ जूलै रोजी प्रदर्शीत होत असलेल्या स्वप्नील जोशी अभिनीत समांतर-२ या वेबसीरीज एका नव्या भूमीकेत आपल्या समोर येणार आहे.
विक्की मोटे यांनी या आधी सॅक्रेड गेम या गाजलेल्या वेबसिरीज मध्ये आणि मेरे साई, देवा शपत, प्रेमा तुझा रंग कसा, छत्रिवाली, घाडगे अन सुन, छोटी मालकिन , बाळु मामाच्या नावान चांगभल, अजब सास की गजब बहू, तुझ्या इश्काचा नादखुळा अशा अनेक मराठी व हिंदी मालिकेत अभिनय केला आहे.
अनेक जाहीरातीत देखील त्यांनी अभिनय केला असुन आता नुकताचं कान्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये गौरवीनात आलेल्या “भारत माझा देश आहे”या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हनुन देखील काम केले आहे. ज्याचे प्रिमीयर ८ जुलै ला होणार आहे.आपल्या अकोल्याचे अभिनय क्षेत्र आता हळु हळु विकसीत होत आहे. नवनवीन कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या अकोल्याचे आणि स्वत:चे नांव उंचावत आहे. हि सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सामान्य कुटुंबातील हा मुलाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याच्या भविष्य कालीन वाटचालीस त्याच्या वर सगळीकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










