सुमेध दामधर
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- देशातील बौद्ध पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आंबेडकर व्हाईस मीडिया फोरम संघटनेची बैठक अकोला येथे दिनांक २० ऑक्टोंबर २०२४ रोज रविवारला अशोक वाटिका हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत राहणार आहे. या बैठकीत संघटनेचे ध्येय धोरण उद्दिष्ट नवंनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देणे व काही महत्त्वाच्या बाबीवर चर्चा होणार आहे. तसेच पत्रकारावर झालेल्या अन्यायविरुद्ध लढणे, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे, विमा पॉलिसी काढणे,राहत असलेल्या परिसरातच त्यांना जागा मिळून घर बांधण्यास सहकार्य करणे, वय वर्ष ६० नंतर पेन्शन मिळून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. तरी सदर बैठकीला आंबेडकर पत्रिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक केंद्रीय अध्यक्ष तथा आय बी सेवन न्यूज चॅनलचे संपादक उत्तम वानखडे, केंद्रीय सचिव प्रकाश सरदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र सावंत महाराष्ट्र प्रदेश सचिव देवचंद्र समदूर यांनी केले आहे.