रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अगदी काल परवा पर्यंत घेणाऱ्या आणि देणाऱ्या अर्थातच बालक आणि त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणा च्या दृष्टिकोनातून पाहिजे तेवढ्या प्रमाणात जागरू कता व उत्सुकताही नव्हती . आज मात्र शैक्षणिक क्षेत्रात जागृती व प्रगती सुद्धा भरपूर प्रमाणात झालेली आहे. म्हणूनच शिक्षण ही काळाची गरज आहे असे वाक्य अनेकांच्या मुखातून ऐकण्या करीता मिळतात आणि ते सत्यही आहे. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षण ही काळाची तर संस्कार ही जीवनाची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण प्रति पादन भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले. ते आज संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ या ठिकाणी एकादशीच्या निमित्ताने येत असणाऱ्या पायी वारकरी दिंडीमध्ये प्रवचन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की ! संस्काराच्या भरभक्कम पायावर उभारलेली जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती जर कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीच आहे .ती टिकून ठेवण्यासाठी बाल संस्कार अत्यावश्यक आहेत.जाग तिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषेचा अभ्यास असणे जितके गरजेचे आहे . तितकेच संस्कृती टिकण्या साठी संस्कृत भाषेचा अभ्यास असणेही आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही प्रगतीला विरोध करणारी नाही. परंतु स्वातंत्र्याचा केवळ स्वैराचार एवढाच अर्थ सद्यस्थितीमध्ये केल्या जात आहे .आणि त्याचे दुष्प रिणाम कुटुंब व्यवस्था उध्वस्त होण्यामध्ये होत आहे .म्हणून प्रत्येक पालकां नी आपल्या बालकांना देशभाषा मातृभाषा , वेशभूषा भारतीय पोशाख , खानपान शुद्ध शाकाहारी भोजन आणि देह संबंध वैवाहिक जीवन या चतु: सूत्रीचे तरी निदान योग्य ते मार्गदर्शन करून ,त्याची सक्तीने अंमलबजावणी त्यांच्याकडून करून घ्यावी . तरच आणि तरच आपल्या पूर्वजांनी जिवापाड प्रेम करून जपलेली संस्कृती आणि परंपरा टिकतील अन्यथा नाही.आज आम्ही पाश्चात्यांचे अंधानुकरण करून जन्माचे व लग्नाचे वाढदिवस साजरी करायला लागलो .परंतु माता पित्याची तेरवी मात्र विसरलो.आज जर आम्ही तेरवी मोडीत काढली आमचे पुढची पिढी आमच्यापेक्षा पुढारलेली असेल आणि ते आमचा अंत्यसंस्कार मोडीतकाढण्या करता मागे पुढे पाहणार नाहीत. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वजांनी चालू केलेल्या आणि जोपासलेल्या विज्ञाननिष्ठ परंपरा आपण सुद्धा सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून जोपासल्या पाहिजेत . मानवी जीवनात बऱ्याच गोष्टी आपण मान्यते वर जगत असतो परंतु परंपरा जोपासत असतांना मात्र वास्तववादाचा पुरस्कार करतो.आज हम दो हमारे दो दादा दादी निकाल दो, हाच अघोषित नियम घरोघरी लागू होत असल्यामुळे, संस्काराचे चालते बोलते विद्यापीठ असणारे आजी आजोबा आज वृद्धाश्रमात हलाखीचे जीवन जगत आहेत. ही संस्कृतीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज कुत्रे वागविणे हे प्रतिष्ठेचे आणि माय बापाला सांभाळणे हे नामुष्कीचे समजल्या जाते . आज विवाह सुद्धा विधी न राहता तो एक करार झालेला आहे . अर्थात घटस्फोटाचा पर्याय हातचा राखूनच विवाह केल्या जातो आहे. परिणामी घटस्फोटाच्या प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे व्यसनाधीन तरुणांची संख्या भरपूर प्रमाणात वाढत आहे
या संपूर्ण विकृती आणि विध्वंसाला केवळ संस्कारा चा अभाव हीच गोष्ट कारणी भूत आहे. स्त्रीभ्रूणहत्येला वेळीच आळा न घातल्यामुळे आज मुला-मुलीतील संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण होऊन,परिणामीअनेक मुलांना लग्न करता मुली मिळत नाहीत. किंबहुना मिली तो मिली नही तो ब्रह्मचारी असे म्हणुन मान सिक संतुलन बिघडलेले कित्येक तरुण आपल्या अवतीभवती वावरत आहेत . हे वास्तव आणि विदारक चित्र समाजामध्ये पाहण्या करिता मिळते आहे. तद्वतच संस्काराकडे दुर्लक्ष जर केले तर कुटुंब व्यवस्था पूर्णतः उध्वस्त होण्याकरता वेळ लागणार नाही.असे अनेक उदाहरणे घेऊन महाराजांनी भविष्यातील धोके उपस्थित पालकांच्या लक्षात आणून दिले. तसेच संस्कारा करीता सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सुद्धा आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतीलक हे कळवितात.