रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान:
बंजारा परंपरेतील सर्वात महत्त्वाचा असलेला तिज उत्सव वाकान येथील बंजारा वसाहतीमध्ये परंपरागत मातृ शक्तीचा गौरव करुन संस्कृती जोपासत समाज बांधवांनी अतीशय उत्साहात तिज हा सण साजरा केला.भारतीय संस्कृतीतील प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगवेगळ्या रीतीरिवाजाने साजरे केले जातात.त्याच पार्श्वभूमीवर वाकान येथे हा उत्सव साजरा करण्यात आला असून नारळी पौर्णिमेपासुन थेट १० दिवसांनंतर येथील तिज महोत्सवाचे विसर्जन करून सागंता करण्यात आली संपूर्ण गावातील मंदीरावर प्रदिक्षणा मारुन व पारंपरिक गीताचे गायन व नृत्य करुन गावातुन तिज मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळ मुली, महिला भगिनीं , तांड्याचे नायक, कारभारी व समस्त गावकरी उपस्थित होते.


