दिपक गजभारे..
तालुका प्रतिनिधी नायगाव..
नायगाव: नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील शेतकरी रावसाहेब आबाजी हंबर्डे, गट क्रमांक 289 मधील एकूण दोन एकर मधील हरभराच्या ढगाला एका अज्ञात व्यक्तीकडून काडीपेटी लावून आग लावल्याची घटना दि. १५/२/२०२६ रोजी सायंकाळी ९:१५ च्या सुमारास घडल्याची माहिती शेतकऱ्याकडून देण्यात आली आहे.
हुस्सा येथील शेतकरी रावसाहेब आबाजी हंबर्डे यांच्या शेतातील एकूण दोन एकर मध्ये हरभरा असून त्यांचे उत्पन्न सरासरी २० क्विंटल च्या वर होणार होते अशी माहिती संबंधित शेतकरी यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांच्या शेतातील हरभरा मागील काही दिवसापासून कापणी करून त्यांचा ढग दि. १४/२/२०२६ रोजी घालण्यात आला होता याचाच फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी आगपेटी घेऊन जाणीवपूर्वक आग लावल्याची चर्चा गावामध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. गावामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून श्री द्वारकाधीश मंदिरांच्या कलशारोहणानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून गावामध्ये भक्तिमय वातावरण असल्याने संपूर्ण भागवत कथा श्रवण करण्यासाठी कार्यक्रमाकडे गेले असता गावातील एका अज्ञात व्यक्तीकडून शेतातील ढगाला आग लावली गेली आहे. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकरी रावसाहेब आबाजी हंबर्डे व दीपक रावसाहेब हंबर्डे यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाणी करून माहिती खरी असल्याचे दिसताच त्यांनी नायगाव येथील तहसील कार्यालय येथे व कुंटूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली आहे. लेखी तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्याकडून सदर घटनेचा पंचनामा करण्यात येईल व दोषी आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती संबंधित शेतकऱ्याकडून सांगण्यात आले आहे…











