कैलास गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी आंबेगाव
मंचर – अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील चवरे, एलभर मळा येथील दीपक देवराम चवरे यांच्या मुलीचा नुकताच शुभ विवाह संपन्न झाला लग्नात खर्चाची बचत करून वस्तीवरील म्हसोबा मंदिराकडे ये जा करणाऱ्या ओढ्यावर स्वखर्चाने लोखंडी पूल बांधून दिल्याने ज्येष्ठ नागरिक महिलांना येण्या – जाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दीपक चवरे यांचे आभार मानले आहेत.
अवसरी बुद्रुक गावच्या पूर्वेला चवरे, एलभरमळा असून या वस्तीलगत ओढा आहे. ओढ्याला पावसाळ्यात व कालव्याचे पाणी सोडल्यानंतर ओढ्याच्या पलीकडे ये जा करता येत नाही ओढ्याच्या पलीकडे वस्तीवरील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीम्हसोबा देवाचे मंदिर आहे त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याला पाणी असल्यावर ये-जा करताना महीला, नागरिकांना कसरत करावी लागत असत या ओढ्यावर छोटासा पुल व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून स्थानिक नागरिक करत होते. दरम्यान येथील उद्योजक दीपक देवराम चवरे व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य चित्रा दीपक चवरे यांची मुलगी श्रद्धा हिचा पुणे येथील गणेश दीपक शितोळे यांच्याशी विवाह संपन्न झाला. मुलीचे वडील दीपक चवरे यांनी लग्नात थोडी काटकसर करून चवरे मळ्यातील भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या म्हसोबा मंदिराकडे ये – जा करणाऱ्या ओढ्यावर स्वखर्चाने लोखंडी पूल तयार केल्याने ज्येष्ठ नागरिक महिलांची जाण्या येण्याची कायमस्वरूपी सोय झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दीपक चवरे, चित्रा चवरे यांचे आभार व्यक्त केले आहे. दिपक चवरे व कुटुबिय सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून त्यांनी भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज यांचे मंदिराचे कामासाठी १ लाख रुपयांची मदत हभप पंकज महाराज गावडे यांच्याकडे दिली आहे.
,——————————
फोटो – अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव चवरे येलभर मळ्याvत दीपक चवरे यांनी मुलीच्या लग्नात काटकसर करून म्हसोबा मंदिराकडे ये जा करणाऱ्या ओढ्यावर स्वखर्चाने लोखंडी पूल बांधून दिला आहे.











