भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – माहुर किनवट राष्ट्रीय महामार्ग व माहुर घाटालगत असलेल्या बाह्य वळण रस्ता व रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे वाहने घसरुन खाली पडत आहे. शिवाय मोटार सायकलचा तर या वळणावरुन नेहमीच किरकोळ अपघात होत असुन. या किरकोळ अपघाताचे रुपांतर मोठ्या अपघाताला सुरुवात झाली असून. वाहने वळवताना वाहकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर महामार्गाचे काम हे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले दाखवण्यात सदर गुत्तेदार धन्यता दाखवत असुन. मालवाढा माहुर घाटातील काम अर्धवट सोडून साधी झाडी झुडपे सुध्दा गुत्तेदार साफ करत नसुन. ह्या एक तर्फी वाहतूकने कितेक आपघाताला आमंत्रण दिले आहे. या दोन किलोमीटर च्या अंतरावर दर दिवसाला काही विपरीत घटना घडत असुनही संबंधित विभागासह झोपलेल्या गुत्तेदारला किती जिवीतहानी होण्याचा अकाडा गाठायचा आहे. हे ही या गुत्तेदाराने व संबंधित विभागाने याचे खुलासा फलक लावावे. अन्यथा तात्काळ प्रलंबित काम पूर्ण करावे.सदर माहुर मालावाढा घाट व घाटालगत असलेला बाह्य वळण रस्ता करणार की नाही याचाही खुलासा फलक लावुन. वाहतूक दार,मोटारसायकल, व नागरीकांना सतर्क करावे. आणि या खुलासा फलकामुळे वाहने, मोटारसायकल,व नागरीक सतर्क राहून.आपले जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतील.











