स्वरूप गिरमकर
तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर : कवयित्री वर्षा सडकर यांच्या वर्षारंग विलास या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा येरवडा येथे व्याख्याता,उद्योजिका क्रांती शितोळे यांच्या हस्ते संपन्न झाला .तसेच यावेळी वेळी निमंत्रित कवीच्या कवी संमेलनाने कार्यक्रमात रंगत आणली.याप्रसंगी क्रांती शितोळे यांनी “या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्याची मला संधी मिळाली हा माझा सन्मान समजते या काव्यसंग्रहात सडकर यांनी मनामनातील भावना मांडल्या आहेत.”असे मनोगत व्यक्त केले. यावेळी नानासाहेब नलावडे,नामदेवराव घाडगे,किशोर भोंडे, विलास सडकर,किशोर चौरे,महेश पाटील या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन अजय बल्लाळ व महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा शाखेचे कोषाध्यक्ष,कवी रमेश जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी विनोद अष्टुळ यांनी केले. कवयित्री वर्षा सडकर व अजय बल्लाळ यांनी आभार मानले.याप्रसंगी रमेश जाधव,बाळकृष्ण बाचल,सीताराम नरके,राहुल भोसले या कवींनी अनेक विषयावर बहारदार कविता सादर केल्या. रमेश जाधव यांनी नेते असतात तुपाशी,कार्यकर्ते कायम उपाशी,निष्ठावंतांना बाजूला सारते घराणेशाही,खरच नांदते का देशात लोकशाही? पैसा व पैशातून सत्ता,हिच त्यांची संस्कृती,सामान्य मतदारांमध्ये कधी होणार जागृती ? या कवितेतून उपेक्षित कार्यकर्त्याची व्यथा मांडली.











