महेमूद पिंजारी
सर्कल प्रतिनिधी : शहापूर
शहापूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची,दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी. देगलूर येथे कार्यकर्ता संवाद बैठक व आढावा बैठ.क घेण्यात आले यावेळी माननीय नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांची या बैठकीसाठी विशेष उपस्थिती लाभली, तळागळातील सामान्य माणसाचे व गोरगरिबाचे जाणीव, असणारे फुले,शाहू, आंबेडकर,विचारांचे राजकारणातील सामाजिक व सामान्य कार्यकर्ते म्हणून, सर्वांसोबत वावरणारे, माजी पंचायत समिती सदस्य,विष्णू पाटील शेकापूरकर यांची देगलूर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी निवडीचे प्रमाणपत्र माननीय खासदार साहेब यांनी विष्णू पाटील शेकापूरकर,यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देगलूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील, व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व देगलूर शहरातील कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष माजी नगर उपाध्यक्ष,व सर्व नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे सर्व पंचायत समितीचे माजी सदस्य,व जिल्हा परिषदेचे सर्व माजी सदस्य व सर्व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी विष्णू पाटील यांनी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधले असता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिलेली ही जिम्मेदारी, मी स्वाभिमानाने व सन्मानाने व देगलूर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करीन व काँग्रेस पक्षाला मोठे भरभरीच बळकट, देण्यासाठी मी मेहनत करीन असे आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधले.











