ज्ञानदेव राजनकर
शहर प्रतिनिधी जळगांव जामोद
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी जळगाव जामोद तालुक्यातील एकूण सहा परीक्षा केंद्रातून १९२६ विद्यार्थी परीक्षा देत असून, शिक्षण मंडळाच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे वाढते प्रकार पाहता या वर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सतत तीन तास तिसऱ्या डोळ्याची (सी.सी.टी.व्ही) कैमेऱ्याची करडी नजर असून या शिवाय बैठे पथक आणि बाहेरील कडक सुरक्षा व्यवस्था आदी बाबीसह विशेष उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे शिक्षण मंडळाच्या अटी व शर्थीचे पालन न करणाऱ्या परिक्षा केंद्रांवर बाहेरील परिक्षा केंद्र संचालक नियुक्त करण्यात आले आहेत तालुक्यातील दि न्यूईरा हायस्कूल जळगांव २८५,
सहकार विद्या मंदीर जळगांव २४९, बि एस पटेल पिंपळगाव काळे ४५९ , संत गाडगेबाबा काॅलेज जामोद ३६५ ,सेठ तुळशिरामजी ढोकणे असालगाव ३७० ,एस के के काॅलेज जळगांव १९८, अशा सहा परिक्षा केंद्रांतून कला, वाणिज्य ,विज्ञान या तीनही शाखांचे १९२६ विद्यार्थी परिक्षा देत असून शिवाय केंद्रा बाहेरील सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त असल्याचे तालुका परीक्षक कार्यालयातून श्री जावरकर सर यांनी सांगितले आहे
१० फेब्रु ते १८ मार्च दरम्यान होत असलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी जळगांव जामोद तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रातून कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचे १९२६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांनी भय आणि कॉपीमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून शिक्षण विभाग सदैव तत्पर आहे.
श्रीकांत जोशी
गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद.











