दिपक गजभारे..
तालुका प्रतिनिधी नायगाव…
कुंटर : नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले असून कुंटूर पोलिसांचे कार्य मात्र निष्क्रिय असल्याचे नागरिकांतून स्पष्ट बोलल्या जात आहे. अनेक मोठमोठ्या चोरीचा तपास आजही लागला नाही .त्यामध्ये मोरइकळ येतील दीड लाखाच्या वर चोरीस गेलेले पैसे व दागिनेचे आजही तपास लागलां नाही.त्यातच चनादाळ असलेल्या 19 लाखाचे चोरीचा हे तपास अजूनही लागला नाही .त्याचबरोबर वजरवाडी , येथील शाळेतील साहित्य व टी सी,सर्व दप्तर जाळे त्याचाही चोराचा तपास अजून लागणे अहे.अनेक चोरीचे तपास कुंटूर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे राहिले असून पुन्हा चोराचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पोलिसांची ग्रस्त पोलिसांची भीती चोराला राहिला नसल्याचे स्पष्ट नागरिकांत बोलल्या जात आहे. दि.14.02.2026 रोजी कोकलेगाव येथील सचिन व्यंकटराव नारे, यांचा घराच्या समोर लावलेली एक पल्सर गाडी तिची किंमत अंदाज एक लाखाच्यावर असल्याचे चोरीस गेले आहे.गरिब शेतकरी असल्याचे त्यांनी सांगितले एक ते दीड च्या सुमारास रात्रीची पल्सर गाडी चोरीला गेले त्याचा तीन दिवसापासून तपास चालू असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. त्यातच कुंटूर येथील दि.16.2.2026 रोजी महबूब शेख यांच्या घरातील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे घटना उघडकीस आली असून डॉग स्कॉट व फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलावून सदर तपासणी केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले व त्यांची टीम बीट प्रमुख कंधारे यांनी दिली आहे. सदर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होते. त्यामुळे पुन्हा चोर सक्रिय झाल्याचे चर्चा मात्र जोरात रंगले असून चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीचे वेळी गाव खेड्यामध्ये एकूण 45 गावाच्या पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीची गस्त घालावी. त्यातच चार बीट आहेत परिसरातील एका बीटमध्ये रात्रीची पोलिसांनी गस्त घालावी गाव खेड्यामध्ये जाऊन पोलिसांची गाडी फिरून पोलिसांचा धाक कसा आहे हे दाखवून देण्यात यावे तरच पोलिसांच्या भीतीने चोर चोरीस करणार नाहीत. अशी चर्चा मात्र चांगलेच रंगत आहे. सदर गरीब शेतकऱ्याची गाडी व कुंटूर येथील घरातील सोने व दागिनेची चोरी केलेला चोरास कुंटूर पोलिसांनी लवकरच पकडून दंड देतील अशी चर्चा चांगलीच रंगत आहे…











