संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवन व परिसरामध्ये रात्रीच्या वेळी काळे धंदे काळ्या रात्री काळा परिसरात सुरू आणि ते पण जोमात सुरू. इंदापूर तालुक्याची टोक भिगवण हे गाव भिगवण पोलीस स्टेशनची हद्द जेथे पर्यंत त्याच्यापुढे दौंड तालुक्याची शेवटचे टोक रावणगावच्या पोलीस स्टेशनची हद्द अशा दोन्ही हद्येच्या मध्ये रात्रीच्या वेळी काळेधंद्यांचा उगमस्थान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये चर्चासत्र तसेच काळ्या गाड्या विदाऊट नंबर प्लेटच्या बसण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन सर्व नियोजित कटरचुन येथून पाय मुळे सुरू होत असतात.आपण बघायला गेलं तर दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोटारी तसेच वायरी यांची खूप मोठ्या प्रमाणात चोरी झालेली पाहायला मिळाली. तसेच कंपनीच्या ज्या मोटारी किंवा लाईटच्या वायरी यांच्या किमती हजारोच्या वरती अशा लाखो हजारो किमतीची मालमत्ता रात्रीच्या वेळी लंपास करून ती कुठेतरी लपवून ठेवून काळे धंदे हे काळोख्यात सुरू आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी पहारा देत लक्ष ठेवत घरफोड्या देखील सुरू यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी टोळक्यांचा समावेश पाहायला मिळतो. टोळक्यांना माहित आहे की मल्लिकनाथ मठा शेजारील परिसर हा सुरुक्षित आहे. त्यामुळे प्रशासन देखील याठिकाणी जास्त लक्ष देऊ शकत नाही याचा गैरफायदा उचलून यांचे हे काळ्या धंद्याचे ठिकाण दिवसेंदिवस फोफावत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यातील धोका वाढल्याशिवाय राहणार नाही. रावणगाव पोलीस स्टेशन असेल किंवा वाहतूक पोलीस असेल यांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.











