संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवण येथे दुपारी 3.30 सुमारास भिगवन शासकीय विश्रामग्रहच्या पाठीमागे दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी तिच्या आई व भावासह दुचाकीवरून आपल्या घरी निघाली असताना चारचाकी वाहनातून आलेल्या संशयितांनी त्यांना अडवून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम मुलगी, तिची आई व भावाच्या डोळ्यात चटणीची पूड फेकली. त्यानंतर मुलीच्या आई व भावाच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दोघेही जखमी अवस्थेत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात ओढून बसवले आणि तेथून पसार झाले.या प्रकरणी जहिर हरून शेख व आयान हरून शेख यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाणे येथे अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार हे भिगवण येथे दाखल झाले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स व संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास सुरू आहे.










