संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून देशातील वाढत्या ऊर्जेची गरज व मागणी लक्षात घेऊन 12 टी.पी.डी. क्षमतेच्या सी.बी.जी. (कॉम्प्रस्ड बायोगॅस) प्लांट उभारणीचे नियोजन सूरू आहे. कॉम्प्रस्ड बायोगॅस हे शाश्वत आणि पर्यावरणपूरक इंधन आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 14) दिली.शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2025-26 ची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील होत्या.हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सी.बी.जी. प्लांटसाठी लागणारे प्रेस मड, स्पेंट वॉश, बहुवर्षीय नेपियर गवत (गिनी गवत), शेतीतील अवशेष (ॲग्रो वेस्ट) आदी आपल्या भागामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे हा प्रकल्प 12 ही महिने सुरू राहील. या उत्पादित कॉम्प्रेस्ड बायोगॅसला (C.B.G.) सर्वत्र मागणी आहे. तसेच या प्लांटसाठी सरकारचे अनुदान मिळणार आहे.ते पुढे म्हणाले, नीरा भीमावरती स्थापनेपासून 28 वर्षे झाली शेतकऱ्यांचा अढळ विश्वास आहे. या विश्वासास पात्र राहून संस्थेचे कामकाज केले जात असल्याने, कारखान्याची प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांना सर्वोच्च ऊस दर देणेसाठी कारखान्याचा साखर उतारा वाढीकरिता, चांगल्या गुणवत्तेचा ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे. आगामी काळात आपल्या कारखान्याचा समावेश राज्यातील प्रमुख कारखान्यांमध्ये असेल, यात शंका नाही.देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला इथेनॉल शिवाय पर्याय नाही तसेच इथेनॉल ही काळाची गरज आहे. सध्या ई-20 इथेनॉल संदर्भात अपप्रचार सुरू आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे देशाचे गतवर्षी एक कोटी 65 लाख एवढ्या कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी इथेनॉल आवश्यक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात सुमारे 25 ते 30 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात 5 गटांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे व भीमेवरील भाटनिमगाव, टणु, शेवरे असे 3 बंधारे असे 16 बंधारे अडविण्याची जबाबदारी निरा भीमा कारखाना घेणार आहे.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून देशातील साखर उद्योगाचे प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावले जात असून, त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांना पुण्यतिथी दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली.यावेळी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सौं.भाग्यश्री पाटील म्हणाल्या, कारखान्याने अहवाल सालातील सन 2025-26 च्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्ये 5,25,657 मे. टन ऊस गाळप करीत सरासरी साखर उतारा 10.76 टक्के मिळाला आहे. तसेच कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, बायोकंपोस्ट प्रकल्प आदी उपपदार्थ प्रकल्प उत्कृष्टपणे कार्यरत राहिले. सदरच्या हंगामात कारखान्याने स्थापनेपासून प्रथमच एका दिवसामध्ये उच्चांकी 6400 मे. टन उसाचे गाळप केले तसेच हंगामामध्ये प्रतिदिनी सरासरी 5815 मे.टन. गाळप क्षमतेचा उच्चांकही निर्माण केला. या हंगामात गाळप झालेल्या सर्व ऊसाचे पेमेंट प्रति टन रू. 3101 प्रमाणे तसेच ऊस वाहतूक तोडणी बिले वेळेवरती अदा करण्यात आली आहेत.कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली आगामी गळीत हंगामामध्ये उसाचे 7 लाख मे. टन गाळप पूर्ण करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे. सहकार चळवळ चालवताना व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक असून, त्यामुळे आगामी काळात कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देईल, अशी ग्वाही सौ. भाग्यश्री पाटील यांनी दिली.प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अहवाल वाचन कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी केले. तर श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला. यावेळी पंडितराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेस लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, कांतीलाल झगडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, शिवाजी हांगे, अँड. अनिल पाटील, दत्तात्रय शिर्के, उपसभापती जयकुमार कारंडे, अमरदीप काळकुटे, महावीर गांधी, चंद्रकांत भोसले, मनोज पाटील, विकास पाटील, किरण पाटील, मोहन गुळवे, प्रसाद पाटील, तानाजी नाईक, दयाराम गायकवाड, रामचंद्र पाटील, सुरेश मेहेर, महादेव शेंडगे, नागेश नागेश नष्टे, भागवत गोरे आदीसह पदाधिकारी, सभासद, अधिकारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
•




