संजय शिंदे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
मदनवाडी : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घ्यावा आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने मदनवाडी चौकाचा राजा ‘एमबी ग्रुप’ यांच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामाजिक उपक्रम शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एमबी ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय साहित्याची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देणे तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.मान्यवरांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारिका (मामी) भरणे राहणार आहेत. यावेळी मेघनाताई बंडगर, जिल्हा परिषद सदस्य, पुणे, हेमाताई माडगे, पंचायत समिती सदस्या, अश्विनीताई बंडगर, सरपंच, मदनवाडी तसेच सारिकाताई बंडगर, माजी सरपंच, मदनवाडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात येणार असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही मिळणार आहे.मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य या सामाजिक उपक्रमासाठी तुकाराम (बुवा) बंडगर, धनुदादा थोरात, विकासशेठ रविंद्र बंडगर, शरद नाना चितारे, तेजस दादा देवकाते, श्री. हनुमंत नाना बंडगर, नानासाहेब अर्जुन बंडगर, स्वप्निल दादा बंडगर, दादासाहेब माणिक थोरात आणि कुंडलिक भाऊ बंडगर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमात परिसरातील विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





