संजय शिंदे
तालुका प्रतिनिधी इंदापूर
भिगवण सालाबादप्रमाणे यंदाही भिगवण ग्रामपंचायत त्यांच्या वतीने श्री चौरंगीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांसाठी नाश्ता व चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली. भिगवन ग्रामपंचायत च्या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पुढील प्रवासास सुरुवात केली. या वेळी इंदापूरचे तहसीलदार जिवन बनसोडे , श्री पारेकर भाऊसाहेब, श्री ग्रामपंचायत सरपंच गुराप्पा पवार, तुषार क्षिरसागर, आप्पासाहेब गायकवाड, जावेद मुलानी, ग्राम महसूल अधिकारी श्री खसाळे, ग्राम महसूल अधिकारी श्री कदम, ग्राम महसूल अधिकारी श्री कुलकर्णी, पत्रकार श्री संजय शिंदे, भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री मुळीक साहेब व पोलीस कॉन्स्टेबल श्री सुद्रिक सर पोलीस महामार्ग भानुदास बंडगर, पोलीस महामार्गाचे कर्मचारी उपस्थित होते यांच्यासह भिगवन ग्रामपंचायत पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या वेळी भिगवन ग्रामपंचायतच्या वतीने पालखीतील विठ्ठलभक्तांना चहा नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते राज्यभरातील विविध घडामोडी, सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक बातम्या एका विश्वासार्ह या उपक्रमाचे वारकरी भाविकांनी कौतुक करत भिगवन ग्रामपंचायतला भरभरून दाद दिली.





