संजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील डाळज नं. २ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा इंदापूरचे लोकप्रिय आमदार मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या सौभाग्यवती सौ. सारिका मामी भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. सौ. अनुष्काताई अनिकेत भरणे यांच्या शुभहस्ते झालेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या शाळेत ये-जा करण्याचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेऊन समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना अनुष्काताई अनिकेत भरणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नका. आई-वडिलांचा सन्मान करा, त्यांच्या शब्दापलीकडे जाऊ नका. शिक्षण हेच तुमच्या उज्ज्वल भवितव्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. मनापासून शिक्षण घ्या, स्वतःच्या कर्तृत्वाने आई-वडिलांचे, शाळेचे आणि इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करा,” असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक जाधव, जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई बंडगर, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सोमनाथ शेंडगे, सरपंच शकुंतला जगताप, माजी सरपंच प्रदीप जगताप, माजी उपसरपंच मनोहर हगारे, धनुदादा थोरात, निलेश हगारे, अजित जगताप, डॉ. विकास हगारे, विकास आढाव, शशिकांत सवाने तसेच मुख्याध्यापक इंगळे सर , गणेश हजारे.यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिक्षणासाठी दिलेला हा सामाजिक हातभार यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविले जावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





