संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
वारंवार होणाऱ्या ऐवद्यरित्या वाहन धारकावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दौंड पोलीस चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी धडक कारवाई चा बडगा सुरू केला 2 जुलै रोजी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पोतदार इंटरनॅशनल स्कूल, मेरी मेमोरियल शाळा, संत तुकडोजी शाळा या ठिकाणी युनिफॉर्म नसणे, सीट बेल्ट न लावणे, लायसन जवळ न बाळगणे, वाहनांमधून जास्त मुलांची वाहतूक करणे, इन्शुरन्स नसणे, पीयूसी नसणे,याबाबत कारवाई केली असून ज्या विदाऊट परमिट च्या गाड्या त्यांना परमिट काढून घेणे, गाड्यांची सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे व वेळोवेळी री पासिंग करणे याबाबत सूचना केल्या आहेत. वास्तविक पाहता वाहतुकीचा समस्या वारंवार येत असून वाहन चालक वारंवार वाहतुकीचे उल्लंघन केल्याने नाहक नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो तसेच पालखी आपल्या अल्पवयीन मुलांना गाड्या दिल्याने यदा कदाचित काही बरे वाईट झाले तर या गोष्टीला जबाबदार कोण याच अनुषंगाने वाहतूक सुरळीत होण्याच्या हेतूने इथून पुढे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन न केल्याने कार्यवाहीचा बडगा सुरूच राहणार असल्याचे शेडगे यांनी सांगितले तसेच शाळेमध्ये भेट देऊन मुलांच्या सुरक्षिततेबाबत वाईस प्राचार्य, एच आर यांना प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांच्या बसेस व वाहतुकीबाबत माहिती दिली आहे सदरची कारवाई ग्रेड पीएसआय चौधरी, कॉन्स्टेबल पोलीस नरळे कॉन्स्टेबल बंडगर व वॉर्डन आकाश शिंदे यांनी केली सदरची कारवाई अजून पुढे चालू राहणार असून सर्वांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे असे आव्हान नागरिकांना करण्यात आले






