संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
उजनी धरणाचे बॅक वॉटरचे पाण्यातील, पाण्याचा मोटारी व केवल चोरीस जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खुप मोठ्या प्रमाणामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी श्री. सोमनाथ शेंडगे साो, सहा. पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ वरीष्ठांना माहीती देवुन मा. वरीष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनचे हददीत मौजे डिकसळ गावचे हददीत डिकसळ चौकीचे समोर भिगवण ते राशीन रोडवर नाकाबंदी नेमणुक वाहनांची चेकींग चालु केली होती.दि २७/०६/२०२६ रोजी रात्रौ ०३:०० व चे सुमारास मौजे डिकसळ गावचे हददीत डिक्सळ पोलीस चौकीचे समोर राशिन भिगवण रोडवर पेलीस अंमलदार अजित सरडे यांना गोपनिय बातमीदार यांचे मार्फतीने माहीती मिळाली की, राशिन ते भिगवण रोडने राशिन बाजुकडुन भिगवण बाजुकडे एक पांढऱ्या रंगाची फोर व्हिलर गाडी येत असुन त्यामध्ये चोरीचा माल असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहीती मिळाल्याने पोलीस अंमलदार अजित सरडे यांनी तात्काळ प्रभारी अधिकारी श्री सोमनाथ शेंडगे सहा. पोलीस. निरीक्षक यांना माहीती दिली असता सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह नाकाबंदी करून संशईत चार चाकी गाडी ताब्यात घेवुन त्यामधील इसम नामे १) निलेश रजुकमार मोटे, वय, २९ वर्ष, रा. सत्यम अपार्टमेंट प्लॉट नंबर. ८८ सेक्टर नंबर. १९ खारपर, रायगड, २) मनोज गुलाब बिंद, वय ३७ वर्ष, रा. बरेनी बारीपूर, ता. कहवा, जि मिंझापुर, ३) डब्लु बाबुलाल बिंद, वय ३१ वर्ष, रा. सदर, ४) विजयकुमार राशिंगार बिंद, वय २५ वर्ष, सदर, ५) बिसाल शिवराज बिंद, बय. २० वर्ष, रा. सदर सध्या सर्व रा. गोपलपटट्टी शेवाळवाडी फाटा मांजरी पुणे यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता ते उडवाउडविची उत्तरे देवु लागली. त्यांचे तब्यात मिळुन आलेल्या गाडीची पाहणी करता सदरची गाडी ही हुंदाई कंपनीची फोर व्हिलर एक्सेंट गाडी नंबर. एम.एच.१२/क्यू.डब्ल्यु. ०९८५ हीमध्ये कॉपरऱ्या काळ्या, निळ्या, लाल, कसेरी, पिवळे रंगाच्या वायर (केवल) ९८१ मीटर अंदाजे किंमत १.३३.६५०/- रू ची व हुंदाई कंपनीची फोर व्हिलर एक्सेंट गाडी नंबर. एम.एच.१२/क्यू.डब्ल्यू. ०९८५ किंमत रूपये ५,००,०००/- रू ची असा एकूण ६.३३,६५०/- रू किंम्तीचा मुददेमाल मिळुन आला. यातील आरोपी यांचे विरूध्द भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा. जि. नंबर. १६४/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम. १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपी यांचेकडे अधिक विचापुस करता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली देली.वरील आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला आहे.९) दौंड पो.स्टे. गुन्हा. रजि.नं. ४४५/२०२६, भारतीय न्याय संहीता सन. २०२३चे कलम. ३०३(२)सदरची कामगिरी मा. संदीप सिंह गिल्ल , पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार साो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मधुकर भटट्टे साो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, मा.प्रमोद क्षीरसागर , वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सोमनाथ शेंडगे, सहा. पोलीस निरीक्षक, अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अजित सरडे, प्रसाद पवार, गणेश पालसांडे, सचिन पवार, समीर झांबरे, रणजीत मुळीक, महेश बोरूडे, पोलीस भांडवलकर होमगार्ड राजेश लांडे, स्वयंम वाघ, यांनी केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कर्चे हे करीत आहेत,






