संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या सन २०२६-२७या वर्षासाठी अध्यक्षपदी प्रविण वाघ, सचिवपदी डॉ. प्रशांत चवरे, उपाध्यक्षपदी मयुरेश रायसोनी आणि खजिनदारपदी संजय चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी रियाज शेख, संपत बंडगर, संतोष सवाने, नामदेव कुदळे, संजय खाडे, कुलदीपक ननवरे, औदुंबर हुलगे, किरण रायसोनी, धनेन्द्र गांधी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष प्रविण वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, येणाऱ्या वर्षात रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या माध्यमातून सर्व सदस्यांना सोबत घेऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील विविध लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल. समाजातील गरजू घटकांसाठी सेवा कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा तसेच क्लबच्या माध्यमातून जनहिताचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल उपस्थित सदस्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.





