संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल मदनवाडी येथे खाऊचे वाटप करण्यात आले. स्व अजितदादा पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यकर्त्यांकडून सर्वाधिक प्रेम मिळालेल्या लोकप्रिय नेत्यांपैकी अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजरामर झाले. प्रशासन चालविण्याचा हातखंडा असणारे अजित पवार हे तरूणाईच्या गळ्यातील ताईत होते. पोटात तेच ओठात असणारे स्वर्गीय अजितदादा हे सार्वजनिक जीवनातील एक दुर्मिळ नेते होऊन गेले. विमान दुर्घटनेत अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू होऊन आज जवळपास सहा महिने झाले तरी त्यांच्या जाण्याची सल अजूनही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडल स्कूल मदनवाडी येथे जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई बंडगर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ सीमाताई काळंगे,आदर्श सरपंच तुकाराम बंडगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष धनंजय थोरात, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात, सतीश बंडगर, हेमंत निंबाळकर, शाळेचे आदर्श शिक्षक श्री कुदळे सर, श्री वनवे सर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना अभिवादन केले.यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ मेघनाताई बंडगर म्हणाले की, अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. कार्यकर्त्यांवर खऱ्या अर्थाने मनापासून प्रेम करणारा नेता म्हणजे अजितदादा होते, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असुन दादांचे विचार, त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खऱ्या अर्थाने अजित दादांना श्रद्धांजली ठरेल. असे म्हणत जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई बंडगर यांनी अजित पवारांच्या कार्याला ऊजाळा दिला.




