संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा इंदापूरचे आमदार मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या सौभाग्यवती सौ. सारिका मामी भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकल वाटप व वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. पंचायत समिती सदस्य श्रीराज भैय्या भरणे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर पडळकर होते. यावेळी श्रीकांत बोडके, समाधान बोडके, सुदर्शन बोडके, संतोष सुतार, नाथाआबा रुपनवर, सुनील पालवे, मुख्याध्यापक लवटे सर तसेच परिसरातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगत जिद्द, सातत्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थिनींचा दैनंदिन शालेय प्रवास अधिक सोयीचा होणार असून त्यांच्या शिक्षणाला निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.सामाजिक बांधिलकी, शिक्षणाला प्रोत्साहन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. कार्यक्रमानंतर आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.





