डेक्कन शुगर साखर कारखान्याची ऊस आयात जोमात
भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहुर – माहुर विभागात व्यापक प्रमाणात ऊस लागवड करुन घेण्यासाठी सत्तत शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करणारे कृषी सहायक सी. एन.चोले.हे अथक परिश्रम घेतात.विभाग प्रमुख आर के सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली. प्रत्येक गावात कृषी सहायक सी.एन.चोले,व कृषी सहायक के.ओ.भगत यांनी भेटी देऊन व्यापक प्रमाणात ऊस लागवड करुन घेतली आहे. आणि ऊस आयात सुध्दा जोमात सुरू केली आहे. सध्या मजुर वर्गाचा तुटवडा असल्याने ऊस हारवेस्टर व्दारे ऊस तोडणी सुरू असुन. स्वतः विभाग प्रमुख आर.के. सुर्यवंशी, कृषी सहायक सी.एन.चोले, कृषी सहायक के.ओ.भगत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात हजर राहून ऊस तोडणी करून घेत आहे. आडल्या नडलेल्य शेतकऱ्यांना अतिशय स्वजळ पणाने कृषी सहायक सी.एन.चोले सहकार्य करतात. ऊस वाहतूक करणारा ट्रक, ट्रॅक्टर, व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या अटी शर्तीमध्ये सुलभता आणुन. निर्यातीखर्च भत्ता कमी करण्याच्या शिफारशी सह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी सहायक सी.एन.चोले सहकार्य करीत आहे. चालु हंगामात ऊस भाववाढ डेक्कन शुगर प्रा.लिमीटेड मंगरुळ यांनी भाववाढ करावी अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विनंती असुन वजन पावती किंवा गाडीचे वजनाची माहिती त्वरित मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.










