समीर शेख
ग्रामीण प्रतिनिधी
अहमदनगर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरापूर मराठी उर्दू या ठिकाणी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 वार सोमवार या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थानी रेणुका माता मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रशांत नाना भालेराव हे होते प्रमुख अतिथी शेवगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीमती शैलजा राऊळ मॅडम, लोकनियुक्त सरपंच अमरापुर सौ आशाताई बाबासाहेब गरड,उपसरपंच गणेश बोरुडे, माजी सरपंच विजयराव पोटफोडे, ग्रामपंचायत सदस्य समीर भाई शेख बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब सुसे ज्ञानेश्वर म्हस्के व सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पोटफोडे व्हाईस चेअरमन हाजी अजीज भाई पठाण , सर्व संचालक,ग्रामविकास अधिकारी जाधोर भाऊसाहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरापूर मराठी व उर्दू माजी विद्यार्थी संघ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी माता पालक व परिसरातील नागरिक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक घुमरे सर, सय्यद सर व सर्व शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला. उर्दू व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम लावणी देशभक्तीपर गीते अतिशय चांगल्या प्रकारे सादर केले . उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला सूत्रसंचालन खैरे सर यांनी केले . व आभार भालेराव सर यांनी मांनले










