संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवन मध्ये दुचाकीस्वार स्वत:चा जीव धोक्यात घालतात, तसेच समोरुन येणाऱ्या वाहनचालकांना हुल देतात. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी कारवाईचा बडगा उगारला.भिगवन येथे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार पोलीस उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी शहरातील भिगवन मध्ये वाहनचालकांवर कारवाई केली. येथील बसस्थानक परिसर, मदनवाडी चौक येथे दिवसभर ही मोहीम राबविण्यात आली. वाहनांचा परवाना नसणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे यासह नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणाऱ्या 30 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल करचे , पोलीस हवालदार भोंग मॅडम. पोलीस हवालदार गलांडे, पोलीस हवालदार झांबरे, व होमगार्ड पद्माकर शिंदे हे कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. पुढे कारवाई अशीच राहील असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले.











