महसूल विभागाचे जानीव पूर्वक दुर्लक्ष
अनीस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महगांव: महागांव तहसील पासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ऊटी येथिल नाल्यावरून अवैध रेती उपसा सुरु आहे. परंतु महागांव येथिल तहसील कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.विषेश म्हणजे हा नाला उटी गावालगत आहे व या नाल्यासमोरच उटीचे ग्रामपंचायत कार्यालय आहे.त्यामुळे उटी येथिल तलाठी यांना हे अवैध रेती माफीया का दिसत नाहीत,या रेती माफीयांनी तलाठी यांचे खीसे गरम केलेत का? असा प्रश्न उटी येथिल नागरिक करीत आहेत. तहसील पासुन अवघ्या ५ कि.मी.वर असलेल्या या नाल्यावरुन भर दिवसा अवैध रेतीची वाहतुक केली जात आहे.परंतु महसुल विभाग या रेती तस्करांवर कार्यवाही का करीत नाही,या रेती माफीयांकडुन महसुल विभाग आर्थिक देवान-घेवान करीत आहे का?असा प्रश्न उटी येथिल नागरिक करीत आहेत.तसेच महागांव तालुका हा रेती तस्करी करीता चांगलाच गाजलेला आहे.काही महीन्यांनपुर्वि कवठा बाजार येथिल रेतीघाटावर अवैध रेती माफीयांकडुन गोळीबार झाल्याची घटना महागांव तालुक्यात घडली होती.त्यामुळे आपल्या गावांत ही याच घटनेची पुनरावृत्ति होणार का?अशी भीती उटी येथिल नागरिकांच्या मनात भरली आहे.करीता महागांव तहसील प्रशासन व तलठी,मंडळ अधिकारी यांनी लवकरात लवकर या रेती माफीयांवर करावी व आम्हाला भयमुक्त करावे अशी मागणी उटी येथिल नागरिक करीत आहेत.


