रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
वाकान : परिसरातील वाकान गावातील शेतकरी दरवर्षी बैल पोळ्याच्या निमित्ताने आपल्या कष्टाळू सोबत्यांचा व बैलांचा सन्मान करतात.यंदाही वाकान गावांमध्ये हा बैल पोळा सण पारंपारिक पद्धतीने गणाचे गायन करुन समस्त गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषाच्या वातावरणात साजरा झाला.शेतकऱ्यांच्या घामाचे सोबती असलेल्या बैलांना सजवून फुलांच्या हारांनी रंगबेरंगी कपड्यांच्या झुलांनी आणी गंधाने नटवुन हा सण एकोबाने व मोठ्या श्रद्धेने पार पडला पुर्वीपासूनच या पोळ्याचे आयोजन गावचे मानकरी माजी पोलीस पाटील स्व.हिरासिंग दगडु राठोड यांचे चिरंजीव गणेश राठोड व हिरासिंग सवाई जाधव यांच्या खांद्यावर असल्याने संपूर्ण गावातील बैलांना नैवेद्य पाणी देऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हि परंपरा रुजली आहे.गेली अनेक वर्षांपासून हा मान गणेश राठोड व हिरासिंग जाधव यांच्या खांद्यावर आहे.आणी त्यांनीही गावकऱ्यांचा हा सण प्रेमाने आणी उत्साह पुर्वक साजरा केला आहे.या सणात केवळ बैलांचाच सन्मान होत नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनातील कष्ट त्यांच्या न थकरणाऱ्या मेहनतीची जानीवही प्रत्येकालाच होते.बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या नात्यांचा श्रमाचा आणि मातीतल्या मानुसकीचा उत्सव आहे म्हणूनच काल वाकान येथे बैल पोळा हा सण संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साह पुर्वक व आनंदाने साजरा करण्यात आला.


