योगेश मेश्राम
तालुका प्रतिनिधी चिमूर
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोज बुधवार ला महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग आणि वाईल्ड- सीइआर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यामानाने ‘रेबीज जनजागृती’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले, आणि प्रमुख पाहुणे म्हणून वाइल्ड सीईआर नागपूर चे श्रीमती मिताली नंदेश्वर तसेच डॉ. निलेश ठवकर, डॉ. मृणाल वऱ्हाडे आणि डॉ. सुमेध वावरे उपस्थित होते. रेबीज हा सर्वात प्राणघातक संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे, ज्यामध्ये रुग्ण-मृत्यू दर १००% च्या जवळ आहे. हा आजार अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांवर आढळतो. भारतात रेबीजचे नेमके आकडे अज्ञात असले तरी, दरवर्षी १८,००० ते २०,००० मृत्यू या आजारामुळे होतात, जगातील एकूण रेबीज मृत्यूंपैकी ३६% मृत्यू भारतात नोंदवले जातात. मानवी रेबीजचे प्रमुख वाहक कुत्रे आहेत आणि 99% पेक्षा जास्त मानवी प्रकरणांसाठी ते जबाबदार आहेत. मार्गदर्शन करताना नंदेश्वर मॅडम यांनी कुत्र्याच्या चाव्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कुत्र्यासोबत थेट डोळ्यात डोळे घालून पाहू नका, शांतपणे उभे राहा आणि हळू हळू मागे सरका. कुत्रा चावल्यास जखम त्वरित साबणाने स्वच्छ पाण्याने धुवा आणि तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन रेबीज प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे, अशी महत्त्वाची माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणेत डॉ. सुनंदा आस्वले यांनी आपला वैयक्तिक अनुभवातून कुत्र्यांना न घाबरता स्वतःच्या बचाव कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. मंचावर उपस्थित डॉ. निलेश ठवकर, डॉ. मृणाल वऱ्हाडे आणि डॉ. सुमेध वावरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. बिजनकुमार शिल तसेच आभार प्रदर्शन डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


