मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
दिनांक14/07/2024 मॉर्डन इंग्लिश हायस्कूल अकोला येथे अकोला जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा व राज्यस्तरीय निवड चाचणी यात स्थानिक सेंट पॉल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय पटकावला भक्ती लखोटिया (सुवर्ण पदक) आयुषी गावंडे (सुवर्ण पदक) रुद्राक्ष घुंगड (रौप्य पदक) मोहम्मद फैजान (रौप्य पदक) अयान अली (कांस्य पदक), तुषार सोनवणे (कांस्य पदक) अनुष्का माळी (कांस्य पदक) स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून स्पर्धेत आपले नाव नोंदविले आहे. या यशाचे श्रेय ते आपले आई वडील संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटीया प्रमोदजी चांडक लुणकरणजी डागा मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी उपमुख्यध्यापिका निमिता गांधी प्रभारी रवींद्र वसे, चैतन्य खारोडे विमल येऊल क्रीडा शिक्षक अनुप चांदणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात.