उमरखेड डेपो चा भोंगळा कारभार
स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
महाराष्ट्रातील पंढरपूरची दरवर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्याचे श्रद्धास्थान असलेले. पंढरपूरची वारीसाठी आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा जनसागर उलटतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून वारकरी मोठ्या श्रद्धेने आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान करतात. परंतु आज दि.15/7/2024 रोजी उमरखेड शहरातील आणि ग्रामीण भागातील वारकरी उमरखेड बस स्थानकात वारीसाठी जाण्याकरता जमले असता. त्यांना जाण्यासाठी कोणतीही गाडी उपलब्ध नव्हती. दोन तासाचा कालावधी उलटून देखील पंढरपूरला जाण्यासाठी गाडीच लागली नाही. वारकऱ्यांनी नितीन भाऊ भुतडा यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी त्यांच्या सहकारी यांना बस स्थानकात पाठवले व वारकऱ्याचे म्हणणे ऐकून संबंधित उमरखेड च्या आगार डेपोच्या प्रमोदिनी किनाके मॅडमची चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी तांत्रिक अडचणीमुळे गाडी ना दुरुस्त आहे. असे सांगितले व पर्याय गाडीची व्यवस्था एक तासाच्या आत मी करून देईल्. असे त्यांनी आश्वासन दिले. अतुल जी खंदारे, पवन जी मेढे, यांनी वारकऱ्याची समजूत घालून गाडीची व्यवस्था होईपर्यंत मी तुमच्या सोबतच असेल. असे आश्वासन दिले. व जिल्हा व्यवस्थापक वंजारी साहेब यांच्याशी अतुल ची खंदारे यांनी संवाद साधून परिस्थिती लक्षात आणून देऊ न तात्काळ गाडीची व्यवस्था करा असे सांगितले. सात वाजता पंढरपूर जाणारी गाडी वारकऱ्यांना घेऊन रवाना झाली. यावेळेस वारकऱ्यांनी नितीन भाऊ चे आभार व्यक्त केले.