कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
दादासाहेब शेळके यांनी गेल्याअनेक वर्षापासून समाजासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे देशातील एकमेव अराजकीय क्रांतिकारी सामाजिक संघटन भिम टायगर सेना हे आहे. अन्याय, अत्याचार व मुक्याला वाचा फोडण्याच काम फक्त आणी फक्त रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त भिम टायगर सेनेतच असल्याचे प्रतिपादन भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भोजला येथे भिम टायगर सेनेचा नाम फलकाचे दिनांक १५जुलै रोजी चे अनावरण सोहळा व त्यानिमित्त आयोजित प्रबोधन मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. त्यावेळी उद्घाटक भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे.हे होते तर प्रमुख पाहुणे श्याम भाऊ धुळे, जिल्हा कार्याध्यक्ष करन भरणे, उपजिल्हाप्रमुख राष्ट्रपाल दादा सावतकर, जिल्हा संपर्कप्रमुख सिंघम ढगे, गीता कांबळे, संतोष गायकवाड इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना दादासाहेब शेळके आपल्या घनाघाती भाषणात म्हणाले की, राजकीय पक्ष समाजाला न्याय देऊ शकत नाही. कारण राजकारणात नफा आणि तोट्याचा विचार केला जातो. तर संघटनेत नफा आणि तोट्याच्या ऐवजी खरे आणि खोट्याचा विचार केला जात असून भिम टायगर सेना ही नेहमी ही सत्याच्या बाजूने राहत आलेली आहे. तसेच भविष्यातही संविधान विरोधकाच्या आणि समाजावर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात नेहमी दोन हात करण्यासाठी भीम टायगर सेना नेहमी सज्ज असल्याचे दादासाहेब शेळके शेवटी म्हणाले.यावेळी दादासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली भिम टायगर सेनेत जाहीररित्या प्रवेश देखील पुसद तालुक्यातील नावाजलेले व कर्तबगार २५ वर्षापासुन पत्रकारीतेचा अनुभव असलेले जेष्ठ पत्रकार आयुष्यमान बळवंतराव मनवर,व संतोष गायकवाड यांनी प्रवेश केला आहे. सामाजीक कार्यकर्ते सैदव तत्पर समाज हितासाठी अहोरात्र झटणारे, गोरगरीबांच्या सुखादुखात तळमळीने धाऊन येणारे मनवर आणी गायकवाड यानी समाजाच्या वेळप्रसंगी संकटकाळी अडी-अडचनीच्या वेळी न्याय कसा मिळवुन देता येईल व भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक ह्याचे संघटन मजबुत करण्यासाठी व दादासाहेब शेळके व कीशोर कांबळे यांच्या खांद्याला खादा लाऊन खेडया-पाडयात गाव पातळीवर शाखा जोडण्याचे काम करण्याचे आश्वासन दादासाहेब शेळके यांना यावेळी सांगीतले आहे. सदरील भिम टायगर सेना तालुक्या पुरतीच नसुन देशातील तीन राज्यात कार्यरत आहे. त्याकरीत तरूण युवकानी सहभागी होऊन राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक दादासाहेब शेळके यांचे हात बळकट करण्यासाठी गायकवाड व मनवर यांनी प्रण घेतला आहे.भिम टायगर सेना शाखा भोजला चे अध्यक्ष वैभव जोगदंडे, उपाध्यक्ष नितीन खंदारे, सचिव अरविंद डोंगरे, सहसचिव करण लोखंडे, कोषाध्यक्ष शुभम खंदारे, सल्लागार सिद्धार्थ खंदारे, सदस्य : संतोष कांबळे, कामेश खंदारे, धम्मपाल कांबळे, युवराज उबाळे, अनिकेत खंदारे, सुरज धुळधळे, विशाल खंदारे, करण कऱ्हाळे, आकाश खंदारे, गणेश पडघणे, पवन पाईकराव, सुरज कोल्हे, सुरज धुळधुळे, प्राण धुळधुळे, अमोल खंदारे, निलेश खंदारे, वैभव खंदारे, शंकर जोगदंडे, अक्षय खंदारे, आशीष धनसावळे व महीला संघटना अध्यक्ष ज्योती गौतम खंदारे व सचिव रंजना सुरेश खंदारे यांनी कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.