स्व भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक यांचा अनोखा उपक्रम
निशांत मनवर.तालुका प्रतिनिधी,उमरखेड
वृक्षरोपण करून भविष्यातील पिड्यांना लाभ देणारे आणि पुढील अनेक वर्षांसाठी सकारात्मक वारसा सोडणारे वातावरण तयार करून हिरवेगार आणि अधिक मजबुत शहर तयार करणे या उदात्त हेतूने वृक्ष रुपी मुदत ठेव म्हणून स्व भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक यांच्या वतीने वृक्षप्रेमींकडून वृक्ष देणगी स्वरूपात रोपे स्वीकारण्यात येत आहे .दि 18 जुलै रोजी सकाळी सात वाजता येथील हनुमान मंदिर गोकुळ नगर येथे औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीची सेवा उपलब्ध होणार आहे .यानिमित्त शहरातील व परिसरातील सर्व वृक्ष प्रेमींना कार्बन क्रेडिट बँक च्या वतीने विनंती करण्यात आली आहे . आपण वृक्ष दानरूपी ठेव निसर्गात ठेवून हवेतील कार्बन झाडांमध्ये साठवून इंटरेस्ट स्वरूपात भावी पिढीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्राणवायूची भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी वृक्ष दान करावे अशी विनंती अशोक शिरफुले अध्यक्ष भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक उमरखेड यांनी केली आहे .हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामाचा सामना करण्यासाठी आणि सक्रियपणे वृक्षरोपण करून शहराचे हिरवेगार आणि जैवविविधता वाढवणे या अनोख्या उपक्रमाला शहरातील व तालुक्यातील वृक्ष प्रेमींनी भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक उमरखेड यांना उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे असे डॉ विजय माने यानी आवाहन केले आहे ..चौकट ।एक नाविन्यपूर्ण उपक्रमकार्बन क्रेडिट बँकेच्या पास बुक मध्ये देणगी देणाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी त्यांनी दिलेले वृक्षा पासून किती प्रमाणत हवेतील कार्बन डायऑक्साईड (CO2 ) वृक्षात साठवले गेले व त्याचे किती प्रमाणात विघटन होऊन किती कर्ब (C) झाडांमध्ये ठेव ठेऊन किती प्राण वायू (O2) हवेत उत्सर्जित करण्यात आले याचा हिशोब त्यांच्या खात्यात मांडण्याची कार्बन क्रेडिट बँके ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.डॉ. विजय माने चेअरमन कृषी महाविद्यालय उमरखेडचौकट ।या उपक्रमासाठी सर्वप्रथम सत्यशोधक शेतकरी संघ उमरखेड यांनी नारळ , कागदी लिंबू ,सीताफळ असे एकूण 151 वृक्ष रोपे दान केल्याचा संकल्प केला आहे यासोबतच राजश्री शाहू महाराज स्मारक समितीने महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 150 वृक्ष दान देण्याचा संकल्प केला आहे .


