मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी :- गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन ऊमेदवारी मीळणयात यावी या करीता भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस. गडचिरोली जिल्हा कार्यालयाकडे उमेदवारी मिळण्याकरीता अर्ज डॉ रविद्र सुरपाम यांनी जिल्हा कॉग्रेस कार्यालयात शहर अध्यक्ष्य सतीश विधाते जिल्हा उपाध्यक्ष्य सालोटकर जी याचेकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी चामोर्शी कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद भगत जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे जिल्हा उपाध्यक्ष निलकंठ निखाडे माजी उपसभापति माधव घरामी गंगाधर पाल अध्यक्ष कुणबी समाज संघटना दिगांबर धानोरकर विदर्भ अध्यक्ष ग्राम संवाद सरंपच अशोशियन प्रभाकर गव्हारे सामजिक कार्यकर्त प्रेमानंद गोगले उपाधक्ष युवक कॉग्रेस, रोशन कोहळे सचिव युवक काँगेस डॉ मनिष रोहणकर’ मिथुन पाल सरपच नेतानीगार व कर्थिकर्मे उपस्थित होते.डॉं रविंद्र नारायण सुरपाम हे अतिशय संयमी शांत स्वभावी मृद भाषी असुन त्यांनी भामरागड तालुक्यात आरोग्य सेवा दिली असुन सामाजिक कार्यात वाहुन घेनारे व्यक्ति आहेत त्यांनी 2010 पासुन मुली वाचवा संदेश अभीयांनाची सुरवात केली असुन ती सेवा अजुनही निरंतर सुरु आहे,विद्यार्थी,विद्यार्थी नी ,महीला बाल वृद्ध यांच्या करीता योजनेची माहीती व प्रसाराचे कार्य करीत असतात, आर्युवेद घरा घरा पोहचवा यासाठी ते निरंतर कार्यशील आहेत समाजसेवेचा ध्यास असनारे डॉं रविंद्र नारायण सुरपाम हे आता राजकारणातील नवा चेहरा म्हणून पाहीले जात आहे.


