भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहुर – माहुर तालुक्याला सध्या अवैध व्यवसायांने ग्रासले असून.गावटी दारु काढणाऱ्यांना भय च राहीले नाही.गुंडवळ येथे असाच प्रकार घडला पण माहुर ला दोन्ही पोलीस अधिकारी अतिशय कर्तव्ये दक्ष मिळाले आहे. माहुर ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री देविदास चोपडे व उप विभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांनी अवैध धंदे बंद होईल असे पर्याय करीत आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आखलेल्या मिशन प्लश आऊट अंतर्गत जलद कारवाई करण्याचे कर्तव्य उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे व पोलीस निरीक्षक श्री देविदास चोपडे यांनी केले असून.गुंडवळ येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांना पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे कळले आहे. गुंडवळ गाव जंगल माळाकाठी लागुन असल्याने.इथे अवैध व्यवसाय देशी दारूचा अड्डा सुरू होणार.असल्याची चाहूल पोलीसांना लागली असल्याने. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या सह.सपो. निरीक्षक शरद घोडके आणि पोलीसांनी गुंडवळ येथील नाल्यात अचानक धाड टाकली.असता अवैध रसायन दारु काढण्यासाठी ५०० लीटर दिसून आल्याने हातभट्टी दारु काढण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा करून ठवलेले फसफसते ५०० लिटर रसायन इतर साहित्य नष्ट करून. गुंडवळ गावात एका घरात तीस बाटली देशी दारू विक्रीसाठी उपलब्ध मिळुन आल्याने जप्त करून दोन्ही ठिकाणच्या ईसामावर गुन्हा दाखल करण्यात आला असून. या कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक श्री देविदास चोपडे आणि सपोनी शरद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली.पोहेका गजानन चौधरी,पोना प्रकाश गेडाम, महीला पोका शिवनंदा जाधव, होमगार्ड देशमुख, शिंदे पोलीस पाटील समील होते.











