इजनी गणातुन प.समीतीसाठी प्रभावी उमेदवाराची गरज: मनोज चव्हाण
रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव:तालुक्यात येत्या काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागणार आहे.यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी हिवरा सर्कल मधील इजनी गणातुन प.समीतीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून नाईक बंगल्याच्या पायऱ्या झिजवत आहेत मात्र माजी मंत्री मनोहरराव नाईक व राज्य मंत्री इंद्रनील नाईक हे कोणत्या पक्षश्रेष्ठीना उमेदवारी देऊन निर्णय घेणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.अनेकांनी प.समीती गटातुन निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.अजीत पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळन्यासाठी तिवरंग येथील उपसरपंच तथा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष युवा नेतृत्व गुणवंत राठोड यांनी जिवातोड प्रयत्नाने प.समीतीच्या उमेदवारीसाठी उचांकीचे शिखर गाटत विकासात माघारलेल्या ईजनी गणातुन विकासात्मक कामे व्हावीत या हेतुने आपली एक वेगळीच छावी निर्माण केली आहे उच्चशिक्षित, विकास कार्य पुरुष प्रशासनवर चांगली छवी प्रभावशाली नेतृत्व असलेले तिवरंग येथील व्यक्ती महत्व सामान्य जनतेसाठी निस्वार्थपणे तत्पर राहुन आपली कर्तव्ये पार पाडणारे गुणवंत राठोड यांनाच इजनी गणातुन प.समीतीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून नागरिकांमधून बोलल्या जात आहे.जनतेच्या हितासाठी अहो रात्र लढा लढणाऱ्या अशा प्रभावशाली नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठीशी मतदार संघातील जनता खंबीरपणे उभी राहणार हे मात्र निश्चित आहे.या बाबत वरिष्ठ निर्णय घेतील का? याकडे हिवरा सर्कल मधील इजनी गणातील मतदारांचे लक्ष लागले आहे एकनिष्ठेने निस्वार्थपणे जनतेसाठी लढा लढणाऱ्या अशा प्रभावी उमेदवारांना संधी मिळाल्यास निश्चितच विकासात माघारलेल्या ईजनी गणातील विकासकामे पुर्णत्वास जातील अशी प्रतिक्रिया वाकान येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.











