संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पोलीस ठाणे हद्दीत सोनगाव ता बारामती येथे अवैद्य दारू निर्मीती व विक्री होत असल्याची गुप्तबामतीदारा मार्फत मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने दिनांक १५/०६/२०२६ रोजी दुपारी १३.०० वाचे सुमारास आम्ही पोलीस स्टाफसह पोलीस ठाणे हद्दीत सोनगाव येथे १) करिना अनिकेत भोसले रा सोनगाव ता बारामती हिचे राहते घराचे आडोश्याला असलेल्या दारूचे अड्ड्यावर छापा टाकला असता अंदाजे २०,०००/- रूपये किंमतीचे २०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करावयाचे रसायन मिळून आल्याने तिचे विरुध्द बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २८२/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २) संजिवनी मजनु भोसले रा सोनगाव ता बारामती हिचे राहते घराचे आडोश्याला असलेल्या दारूचे अड्डुड्यावर छापा टाकला असता अंदाजे ४०,०००/- रूपये किमतीचे ४०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करावयाचे रसायन मिळुन आल्याने तिचे विरुध्द बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २८३/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच दिनांक १४/०६/२०२६ रोजी ११.३० वाचे सुमारास गोदरेज कंपनीचे आडोश्याला एम.आय.डी.सी बारामती येथे एक इसम देशी दारूची विक्री करत असल्याचे मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह छापा टाकला असता इसम नामे नागेश प्रकाश चंदनशिवे रा दुर्गा टॉकीज जवळ बारामती ता बारामती हा त्याचे कब्जात ५६०/- रूपये किंमतीच्या ९० मिली मापाच्या १४ सिलबंद बॉटल मिळुन आल्याने त्याचे विरूध्द बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २८१/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री संदीप गिल, मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, श्री सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे श्री नारायण पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि/विक्रम पवार, पोउपनिरी/युवराज पाटील, सफौ/सुरेंद्र वाघ, पोहवा/खारतोडे, पोहवा/एकसिंगे, मपोहवा/राजश्री आटोळे, पोशि/निलेश वाकळे, पोशि/सौरभ तुपे गुन्हे प्रकटीकरन शाखेचे पोलीस अंमलदार व पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अंमलदार अशा वेगवेगळया पोलीस पथकाने सदरची कारवाई पार पाडली आहे.







