संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल मदनवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास सरपंच सौ अश्विनीताई बंडगर, उपसरपंच सौ लक्ष्मीताई मारुती बंडगर,
मा उपसरपंच श्री शहाजी बंडगर, हभप दिलीप बापू ढवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश अभिमन्यू गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पूजा सकुंडे, सौ.पिसाळ ताई, सौ. वर्षा सोनवणे,पालक ,.अर्जुन ताई, मुख्याध्यापक श्री प्रकाश वाघ सर ,श्री प्रमोदकुमार कुदळे सर श्रीराम वणवे सर व जिल्हा परिषद सदस्या सौ.मेघना ताई बंडगर, पंचायत समिती सदस्य सौ.हेमाताई माडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ.सीमाताई काळंगे, सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे फुगे, गुलाबपुष्प देऊन तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानही करण्यात आले सौ.अश्विनीताई मारुती बंडगर सरपंच, सौ लक्ष्मीताई मारुती बंडगर उपसरपंच, माजी उपसरपंच श्री शहाजी बंडगर, हभप दिलीप बापू ढवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश अभिमन्यू गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पूजा सकुंडे, सौ.पिसाळ ताई, सौ. वर्षा सोनवणे,पालक ,.अर्जुन ताई, मुख्याध्यापक श्री प्रकाश वाघ सर ,श्री प्रमोदकुमार कुदळे सर श्रीराम वणवे सर व जिल्हा परिषद सदस्या सौ.मेघना ताई बंडगर, पंचायत समिती सदस्य सौ.हेमाताई माडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ.सीमाताई काळंगे यांनी नवागत विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घ्यावा तसेच श्रनेन्जा प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री प्रकाश वाघ सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोदकुमार कुदळे सर यांनी केले कार्यक्रमांसाठी ग्रामस्थ उपस्थित होते.





