संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बेशिस्तपणे दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.संगम वाईन्स आणि आठवडे बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला बसणारे फळविक्रेते तसेच बेशिस्त पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर सपोनि शेंडगे आणि त्यांच्या पथकाने रविवारी या परिसरात उपस्थित राहून नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई केली. यामध्ये तब्बल २५ चालकांवर कारवाई करत १७हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच एकावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.याशिवाय आठवडे बाजारात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फळविक्रेत्यांनाही शिस्त लावण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न केल्यास साहित्य जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. भिगवण पोलिसांची ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याने बेशिस्त वाहनचालकांना चाप बसणार असून, शहरात वाहतुकीला शिस्त लागेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
चौकट:
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी २५ बेशिस्त चालकांकडून 17500 रुपयाचा दंड वसूल-
सोमनाथ शेंडगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवन






