संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
बारामती तालुका पोलीस स्टेशन चा मोका गुन्ह्यात चार वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 563/2022 भा.द वि कलम 307, 120(ब ), 201, 143 सह आर्म ऍक्ट कलम 2,25 मधील आरोपी नामे सोनू उर्फ ओंकार संजय जाधव राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा गुन्हा केल्यापासून फरार होता आज रोजी फरार आरोपी सोनू उर्फ ओंकार संजय जाधव हा पोलीस ठाणे हद्दीत एम आय डी सी परिसरात येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती सदर बातमीचे अनुषंगाने आम्ही पोलीस स्टाफ सह एम आय डी सी परिसरात पेट्रोलिंग करत असताना सोनू उर्फ ओंकार संजय जाधव राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा मिळून आल्याने त्यास अटक केली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री संदीप गिल, मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री गणेश बिरादारर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, श्री सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे श्री नारायण पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ग्रेड पो उप नी/ श्री कल्याण शिंगाडे, सफौ/सुरेंद्र वाघ, पोहवा/खारतोडे, पोहवा/एकसिंगे, पो हवा आप्पा दराडे, पोशि/निलेश वाकळे, पो शि मनोज पवार यांनी सदरची कामगिरी केली आहे.





