संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
बारामती तालुक्यातील बारामती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. दत्तु बबन जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. तब्बल 35 वर्षे सेवा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे.हा सत्कार समारंभ मंगळवार दि.०२ जून २०२६ रोजी सायंकाळी 5.00 वाजता तारादेवी लॉन्स भिगवन ता. इंदापूर, जि. पुणे येथे पार पडणार आहे.कार्यक्रमास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा.संदीपसिंह गिल,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मा. गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.श्री. पोलीस उपनिरीक्षक दत्तू बबन जाधव यांनी आपल्या सेवाकाळात शिस्तबद्ध कामकाज, जनतेशी सुसंवाद आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे विशेष ओळख निर्माण केली.



