संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येणारा जागतिक योग दिन राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड येथे मा. समादेशक आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनात दौंड मुख्य परेड मैदानावर पहाटेच्या प्रसन्न व निसर्गरम्य वातावरणात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये मा. समादेशक सहायक संजय भोसले, पोलीस निरीक्षक प्रफुल वाघमारे, पोलीस कल्याण अधिकारी पांडुरंग बुरंगे व इतर अधिकारी, अंमलदार व विविध प्रशिक्षण सत्रातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये योग प्रशिक्षक श्री जगदाळे यांनी विविध योगासने प्राणायाम, व ध्यानधारणा घेतले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढते, याबाबत अपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या योगाभ्यास सराव शिबीरामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमादरम्यान नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सहभागी सर्वांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संकल्प केला.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७ दौंड यांच्या वतीने करण्यात आले असुन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.





