स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्री जगदंबा माता मंदिर या ठिकाणी आज नागपूर येथील टायगर ग्रुप ऑफ एडवेंचर, क्रीडा भारती सायकली ग्रुप यवतमाळ, तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यावेळेस उमरखेडचे पर्यावरण मित्र वृक्ष सेवा समितीने त्यांचे जंगी स्वागत केले. व त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था केली. दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकऱ्यांचा जनसागर उलटतो त्याच अनुषंगाने नागपूरचे वारकरी सायकल स्वार ही वारी सायकलने पूर्ण करतात. नागपूर येथून दि.11 जुने रोजी निघालेली सायकल वारी आज दि.13 जुलै रोजी 270 किलोमीटरचा अंतर कापून सकाळी नऊ वाजता उमरखेड येथे आगमन झाले. त्यांचे औदुंबर नगरीतील पर्यावरण मित्र वृक्ष सेवा समितीने स्वागत करून जगदंबा मंदिराच्या परिसरात वारकऱ्यांच्या हस्ते एक वृक्ष लावण्यात आले. त्यावेळेस पर्यावरण समितीचे मित्र गजानन चौधरी जमीर खतीब निखिल साखळी सो आदिती साखळी शाम चेके आधी उपस्थित होते.