विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:33 कोटी वृक्ष लागवड झाली तर 33 लाख वृक्ष तरी जिवंत असायला पाहिजेत ना कागदावर 33 कोटी ही जिवंत दाखवता येतील पण प्रत्यक्षात उद्दिष्ट किती पूर्ण झालं हा शोधाचा विषय आहे .लागवड झालेल्या झाडांना खत द्यायला पाहिजे निंदन करायला पाहिजे आणि महिन्यात एकदा वीस लिटर पाणी सुद्धा द्यायला पाहिजे तसेच त्या वृक्षला काटेरी कुंपण सुद्धा करायला पाहिजे . पण कसे -बसे खड्डे खांदून झाडे लावणे आणि खत निंदण आणि पाणी दिल्याचे बोगस बिले काढून पैसे उचलणे हा प्रकार वनविभागात सर्रास सुरू असतो . यांच्या कितीही तक्रारी करा वर पासून खालपर्यंत पैसे खाल्ले असल्यामुळे कोणावरही कारवाई होताना दिसत नाही .निवडणुकीच्या तोंडावर मात्र मंत्र्यांना क्लीन चीट दिली जाते .या क्लीन चीटचे आश्चर्य वाटते .हिम्मत असेल तर महाराष्ट्र राज्यातील वृक्ष लागवड सोडा केवळ यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सामाजिक वनीकरण असेल किंवा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालया अंतर्गत वृक्ष लागवडीची चौकशी करा ; खरा भ्रष्टाचार कोठे कसा व किती झाला हे आम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन दाखवतो आणि मग कोणाला क्लीन चीट द्यायची ते ठरवा ! मग वन खाते किती भ्रष्ट आहे हे कळून चुकेल .