स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आघाडी कडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. उमरखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे प्रतिक्षा कुकडे या महिलेचा मृत्यू झाला. असल्याबाबतची तक्रार मूत महिलेच्या नातेवाईकाकडून पोलीस स्टेशन उमरखेड येथे करण्यात आली होती. या घटनेला एका आठवड्याच्या वर कालावधी उलटून गेला. तरीदेखील अद्याप पर्यंत संबंधितावर कारवाई झाली. नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी कडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना या प्रकरणातील दोषीवर तात्काळ कारवाई करा असे जिल्हा अध्यक्ष नलिनी ठाकरे यांनी म्हटले दि.6 जुलै रोजी पुसद तालुक्यातील हुंडी येथील प्रतीक्षा अमोल कुकडे या महिलेचे सिजर व जिल्हा रुग्णालय उमरखेड येथे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले होते. त्यामध्ये सदर महिलेचा अतिरक्तस्त्रावाने नांदेड येथे 7 जुलै रोजी मृत्यू झाला . या घटनेस जबाबदार असणाऱ्या वर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधाचा अभाव असल्यामुळे. रुग्णाची हेळसांड होत आहे. उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला करोडो रुपयाचे बांधकामाचा खर्च करून देखील केवळ इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत मृत्यू महिलेच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना शरद पवार गटाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष नलिनीताई ठाकरे, लक्ष्मीताई वानखेडे , उपाध्यक्ष स्नेहल टेकाळे, स्वाती पाचकोरे, शहराध्यक्ष शरयु सुरोशे, सखु गायकवाड आदी उपस्थित होते.










