महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि13:- वरोरा:- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपुर च्या गरजू विद्यार्थ्यांना ट्रस्टचा स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत शैक्षणिक दत्तक घेऊन मदतीचा हात सतत देण्यात येत आहे. वरोरा तालुक्यातील किसान विद्यालय माढेळी येथील इयत्ता नववी आर्यन गौतम कांबळे व इयत्ता सहावी अनन्या गौतम कांबळे या दोन्ही भावंडानास्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत शैक्षणिक दत्तक घेऊन मदतीचा हात दिला . वडिलांची प्रकृती ठीक नसून मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यांची आई करीत असते. सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या पुढाकाराने त्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वितरण करण्यात आले. त्या दोन्ही भावंडाना ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्य सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी त्यांची आई सुनीता कांबळे, कार्तिक राऊत, ओकेश्वरभाऊ डोगे,रोशन भोयर, शुभम हीवरकर, प्रमोद रेवतकर, उत्तम तडस उपस्थित होते. गौतम कांबळे यांनी व्यक्त केली ट्रस्ट विषयी कृतज्ञता माझी प्रकृती बिघडली त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या पत्नीवर आली मोलमजुरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत पण माझ्या आजारामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. रविन्द्र शिंदे यांच्या ट्रस्ट कडून मिळाल्याने मदतीने चिंता दूर झाली असून नेहमी पाठीशी आहे असा आधार दिला. ट्रस्टचे अध्यक्ष धनराजजी आस्वले हे नेहमी ट्रस्टच्या योजना व्दारे सर्व गरजूंना मदत करीत असतात.याप्रसंगी भविष्यात नेहमी आम्ही गरजु मदत करु व सतत ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविद्र शिदे हे सदैव समाजातील शेवटच्या टोका पर्यत प्रत्येक घटकांला सतत मदत करीक असते याबाबत माहीती देवुन अभिजीत कुडे यांनी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तत्पर आहे असा आधार दिला असे गौतम कांबळे म्हणाले.