सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
तोरणमाळ ते सिंदीदिगर या १५ किलो मीटर अंतराच्या घाट रस्ताची दुरवस्था झाली आहे जागजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करत रस्ता पार करावा लागत आहे खसलेला रस्ता आणि पुलाला पडलेले भगदाड अपघात आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. तोरणमाळ ते सिंदीदिगर या दरम्यान असलेल्या घाट रस्त्यावरील वळण आणि चढावाचा भाग खचल्याने वाहन काढावे कसे असा पेच वाहनधारकांना पडला आहे.घाट चढतानांच एका ठिकाणी वळणावर रस्ता खचल्याने वाहनांचा वेग कमी केल्याने मालवाहू चारचाकी वाहन मागे आल्याने अपघात घडला.