महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.16:- वरोरा:- तालुक्यातील नागरी येथील शेतकरी सुरेश पावडे यांचा बैल शेतात गोट्यात बांधुन असताना सर्पदंश झाल्याने जागीच मृत्यू झाला. शेतकरी संकटात सापडला असून या हंगामात बैल मरण पावल्याने शेतकर्यांच्या समोर खूप मोठी समस्या उभी राहिली आहे. या बाबत शेतकऱ्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना सैनिक अभिजित कुडे यांना कॉल करुन या घटनेची माहिती दिली. प्रकृती ठीक नसून तात्काळ अभिजित कुडे यांनी शेतकर्यांच्या बांधणार जाऊन पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलविले . जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे सूचनेनुसार अभिजित कुडे यांनी तात्काळ शेतात जावून पाहणी केली. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा केला. संबंधित विभागाला तश्या सूचना करून तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे. हंगामात बैल नसले तर शेतकरी शेती कसा करेल त्याला बैल शिवाय पर्याय नाही त्यामुळे दुसरा बैल घ्या साठी या हंगामात शेतकर्याची आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे मिळणारी मदत ही भरीव व तात्काळ देण्यात यावी अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली. शेतकर्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ अशी हमी दिली. शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना उभी आहे असा विश्वास व्यक्त करून शेतकर्याला धीर दिला. संबंधित विभागाला कॉल करुन मदत तात्काळ द्यावी अशी मागणी केली. यावेळी सुरेश पावडे ,नारायण तेलंग, मंगेश पावडे,देवानंद नरड ,सुनील बुरीले, अतुल बुरीले ,नामदेव पिसे ,शंकर जवादे व शेतकरी उपस्थित होते.