शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू:- सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे वारकरी संप्रदायातील महत्वाचा दिवस म्हणजे ‘आषाढी एकादशी’ त्या निमित्त (ता.16) वार मंगळवार रोजी एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सी.बी.एस.ई स्कूल येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थाप क अध्यक्ष डॉ. संजयजी रोडगे, प्रशालाचे मुख्याध्या पक कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रगती क्षीरसागर व शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. संजय रोडगे म्हणाले, वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. त्या मंदिराला भक्कम आधार देण्याचे काम संत एकनाथांनी केले. व त्याचा कळस रचला तो तुकोबांनी म्हणजे संत तुकाराम महाराजांनी हीच वारकरी परंपरा या संत महात्म्यापासून चालत आलेली आहेत ती आजपर्यंत चालत आहे. आपल्या शाळेत ही वारी दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या कार्यक्रमांमध्ये वर्ग पाचवी व सहावी च्या मुला मुलींनी विठ्ठलावर गीत गायन केले तसेच नृत्यही सादर केले. अशाप्रकारे दिंडी, भारुड,अभंग,फुगडी या सर्व लोकगीतांचे लोक नृत्याचा व वारकरी परंपरेचे दर्शन आपल्याला या ठिकाणी झाले आहे. आपली शाळा आज पंढरपूर झाली आहे. चिमुकल्या मुलांनी गीत गायन करून व नृत्य सादर करून सर्वांच्या मनात पंढरपूर मधील विठ्ठलाची भक्ती जागृत केली आहे .कार्यक्रमाच्या यशस्वि तेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.